चिमूर 23 ऑगस्ट रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पिंपळनेर नवीन वस्ती येथे दरवर्षीप्रमाणेच यंदाही ताना पोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लहान मुले लाकडी बैलांना सजवून त्यांचे मिरवणूक काढतात मोठ्या बैलांना हाताळून शकणाऱ्या मुलांसाठी हा सण खास असून त्यांच्या उत्साहासाठी आणि हौसेसाठी हा ताना पोळा भरवला जातो गावातील काही राजकीय नेते मंडळी व समाज सुधारक यांच्याकडून बक्षीस मुलांना देण्यात आले