गेल्या काही दिवसांपासून ठाणे तसेच मुंबई शहरात सोशल मीडियावर "आरटीओ-ई चलन" किंवा "ट्रॅफिक ई-चलन" यासारख्या नावाने APK फाईल्स व्हायरल होत आहेत. ज्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक होतो आणि त्याचा कंन्ट्रोल मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगार मोबाईलमधील बॅक अॅप्लीकेशनमध्ये जावून खात्यातील रक्कम अन्य खात्यावर वर्ग करून घेतात तसेच ते बँक अॅप्लीकेशनमधून लोन करीता अर्ज करून ते लोन देखील वर्ग करून फसवणूक करतात अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्तालयाने दिली असून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.