गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात सर्वत्र गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर पवनी तालुक्यात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पवनी येथील बेलघाटा वार्डातील मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी गणेश मूर्तीचे विधीवत पूजन करून आशीर्वाद घेतले. आमदार भोंडेकर यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.