फिर्यादी प्रमोद सुधाकर मुनेश्वर यांच्या तक्रारीनुसार 20 ऑगस्टला पंजाबी जिनिंग जवळ फिर्यादी एम एच 30 ए ए 5602 या क्रमांकाच्या वाहनाने जात असताना एपी 01 व्ही 8282 या क्रमांकाच्या ट्रक चालकांनी त्यांच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रॉंग साईडने येऊन फिर्यादीच्या वाहनास धडक देऊन अपघात केल्याने फिर्यादी व फिर्यादीचा साथीदार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी 20 ऑगस्टला घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.