महोत्सवांतर्गत २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता कालका माता मंदिरापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता कोरंभी रोडवरील श्री चंडिका माता मंदिर देवस्थान येथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. आगामी दिवसांतही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कीर्तन, भजन तसेच संगीतमय सादरीकरणे होणार असून, पवनीकरांसह परिसरातील नागरिकांसाठी हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.