सिस्पे घोटाळ्यातील आरोपींचा जामीन फेटाळला श्रीगोंदा : इन्फिनिटी बिझन इंडिया प्रा. लि. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींचा डिफॉल्ट जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दुपारी बारा वाजता नामंजूर केला आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एजंट गुलाबशीराम गलांडे (वय ४०, रा. देवळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा) व अनिल झुंबर दरेंकर (वय ३२, रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा) या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना