महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निर्देशने केली. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हुकूमशाही विधेयक मागे घ्या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला.