मध्यस्थामार्फत नवरी शोधून लग्न करण्याचा प्रकार वडगाव (सि.) येथील तरुणाच्या चांगलाच अंगलट आला. लग्न जमवून खोटा विवाह करीत सातारा जिल्ह्यातील नवरीसह पाच जणांनी त्याला सव्वा लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव (सि.), ता. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार धाराशिव पोलिस ठाण्यात नवरीसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती धाराशिव पोलिसांच्या चार वाजता देण्यात आली.