आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील रमाई नगर हबीब नगर येथे स्थानिक रहिवाशांच्या नळाला नगरपरिषद कडून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये दूषित पाणी आढळून आले आहे, यामध्ये चक्क पाण्यात आळाया आढळून आल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी थेट मुख्याधिकारी कार्यालय नगरपरिषद यांचे दालन गाठत त्यांना निवेदन देऊन आम्हाला स्वच्छ पाणी द्यावे जेणेकरून आमचे आरोग्य सुदृढ राहील अशा स्वरूपाचे निवेदन दिले आहे, याप्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.