धुळेजवळील अवधान परिसरातील निभा नगरात महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे. नव्याने बांधलेल्या काँक्रीट रस्त्यांना गटारी नसल्याने पहिल्याच पावसात पाणी थेट घरात घुसले. घरगुती वस्तूंचे नुकसान, चिखल, घाण आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यधोके निर्माण झाले आहेत. संतप्त नागरिकांनी तात्काळ गटारींची व्यवस्था करून निचऱ्याची मागणी केली असून, दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.