जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा श्रीगोंदा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा श्रीगोंदा : तालुक्यात सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून सरसकट पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी तालुक्यातील विसापूर, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, घारगाव आणि कोळगाव या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी आज सायंकाळी सात वाजता केली.