परळी तालुक्यातील मोहा येथे, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता, बीडचे माजी खासदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाधर बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत मुख्य वक्त्या म्हणून माजी खासदार तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड वृंदा कारात यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. गंगाधर बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.