भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी गुरुवारी, ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४२ वाजता प्रश्न विचारला की, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईत झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तेव्हा त्यांनी एक शब्द का काढला नाही? आज पत्र लिहून राजकीय नाट्य करणारे, त्या काळात मुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकारला एक पत्र तरी लिहिले होते का, असा सवाल कुलकर्णी यांनी केला.