पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जनसुरक्षा कायद्याचा बॅनर जळून निषेध व्यक्त करण्यात आला, जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. जन सुरक्षा कायद्यामुळे आंदोलने विरोध करण्याचा हक्क सरकार हिरावून घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जन सुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.