देवरी तालुक्यातील चिचगड येथे अनुसया शिरपत भोयर वय 55 वर्ष राहणार शिरपूर भागी यांच्या पायावरून ऑटो गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यावर पुढील उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.