मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी सोलापुरातून तब्बल २५ हजार मराठा बांधव मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आंदोलनाची चळवळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील बांधव देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सामील होऊन आपला ताकदवान आवाज बुलंद करणार असल्याचे ते म्हणाले.