वर्धा शहर लगत असलेल्या बोरगाव येथील एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे वर्धा शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरगुती वादाची तक्रार दाखल न केल्याने निराश झालेल्या या महिलेने थेट पोलीस स्टेशनजवळच रेल्वे पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तिथे उपस्थित नागरिकांनी आणि तिच्या पतीने तिला वेळीच वाचवले. सदर घटना आज 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे