मुक्ताईनगर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चोरट्यानी दिनांक 27 सप्टेंबरच्या रात्री ते 28 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत एकाच भागातील तीन घरे फोडत 41 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली. हे अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २८ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी दिली.