विदर्भात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण साजरा करण्यात येतो. ही परंपरा अधिक वाढावी यासाठी धापेवाडा येथील समस्त गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच राष्ट्रीय पवार छत्रिय महासभेच्या विद्यमानाने दिनांक 22 ऑगस्ट रोजी शुक्रवारला राष्ट्रीय पोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जिल्ह्यात पहिल्यांदाच करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व त्यांची गौरवशाली परंपरा जोपासण्याचे काम केले जाणार होते.