डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात येणार आहे. परिणामी आज, बुधवारपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महामेट्रोकडून करण्यात आलं आहे.