साकोली येथील संताजी मंगल कार्यालयात साकोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवार दि.26 ऑगस्टला दुपारी तीन वाजता करण्यात आले होते.माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच येणाऱ्या साकोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले