दि.4 सप्टेंबरला सायं.7 वाजेच्या सुमारास गोरेगाव पोलीस ठाण्यात येथे विराजमान झालेले गणपती बाप्पाचे आज शहरातील पवन तलाव येथे पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ढोलताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले.यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, या अशा घोषणा देण्यात आल्या. नाचत गाजत बाप्पाचे थाटात विसर्जन पार पडले. यावेळी पोलीस अधिकारी सुजित घोलप,आनंद चव्हाण,बिजेंद्र बिसेन ,सुरेश रंहागडाले,श्री लांजेवार,मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.