शनिवारी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता व शिस्त राखण्याचे आवाहन करत नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित व सुरळीत विसर्जनाची तयारी करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना केले. पोलिसांकडून सुरक्षा, वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले असून यामुळे सर्वांनी आनंदी व सुरक्षित वातावरणात गणेश विसर्जन साजरे करावे, असे आवाहन त्यांनी केले.