22 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी वनपरिक्षेत्रातील जाटलापूर चिखली मार्गावर 21 ऑगस्ट च्या मध्यरात्री फार्म हाऊस समोर बसलेल्या शेतकरी चंद्रशेखर बल्की यांच्यावर बिबट्याने हल्ला केला जात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.