दि.मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया जिल्हा ची नुकतीच निवडणुक संपन्न झाली. यामधे अर्जुनी-मोर. तालुक्यातुन तिन संचालक निवडुन आले. त्यामुळे तिन्ही संचालकांचा दि. तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी-मोर. च्या वतीने केवळराम पुस्तोळे, सौ. रचनाताई गहाणे, विजयसिंह राठोड यांचा शाल श्रीफळ देऊन ता.30 सत्कार करण्यात आला.खरेदी विक्री समितीच्या सभागृहात आयोजीत सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष तथा खरेदी विक्री समितीचे उपाध्यक्ष विजय कापगते होते