बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जनसुरक्षा कायद्या विरोधात, बुधवार दि.10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम भाई, अॅड. उषा दराडे, राजेंद्र मस्के यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.नेत्यांनी सांगितले की, हा कायदा नक्षलवाद थांबवण्यासाठी नसून सरकारच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी आहे. शांततामय आंदोलन, मोर्चा, उपोषण यांना गुन्हा ठरवून लोकशाहीवर गदा आणली जात आहे