लोणावत परिवारातील कल्पेशाने केले ३१ दिवसांचे मासखमन उपवास. चातुर्मास महिन्यात विविध प्रकारचे उपवास केले जातात. त्यामधील सर्वात कठीण मानला जाणारा मासखमन उपवास तब्बल ३१ दिवसांचा असतो. लोणावत परिवारातील कल्पेश लोणावत यांनी आपल्या डोक्याचे दोन मोठे ऑपरेशन झाल्यानंतरही हा कठोर उपवास पूर्ण करून एक विशेष उदाहरण घालून दिले आहे.