जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षासुचीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, काही कारणास्तव हा मेळावा आता पुढील तारखेला आयोजित करण्यात येणार असून त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. सर्व अनुकंपा उमेदवार व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.उमेदवारांनी अधिकृत घोषणेवर लक्ष ठेवावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.