अग्रसेन भवन, गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाची अत्यंत महत्त्वाची पदाधिकारी बैठक माननीय श्री. धर्मपाल मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.्. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः प्रत्येक बूथ स्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्याचे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्याचे आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले.