जालना जिल्ह्यात अल्पवयीन वाहनचालकांवर धडक मोहीम, 209 चालकांवर कारवाई, 6 लाख 38 हजाराचा दंड केला वसूल आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर व जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून वाढत्या प्रमाणात वाहन चालविणे आणि त्यामुळे अपघात होण्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने अल्पवयीन वाहनचालकांविरोधात मोठी कारवाई करत विशेष मोहीम राबवली.