पोळ्याचा दुसरा दिवस उजाडला तो लहान मुलांच्या "तान्हा -तान्हा पोळा, बैल झाले गोळा" या आवाजान, या वर्षी तान्हा पोळा शनिवारी आल्याने ही हाक अमंळ थोडीशी उशिराच कानावर आली. आदल्या दिवशी घरात पूजेला मांडलेले मातीचे अथवा लाकडी बैल घेऊन बच्चे मंडळी तान्हा पोळा मागायला बाहेर पडली. पूर्वी लिमलेटची गोळी अथवा 5-10 पैशाच नाण हाती पडल्यावर खुश होणारी बच्चे कंपनी आता मात्र चॉकलेट- टॉफी किंवा 5 - 10 रुपयाच नाण हाती पडल्यावर हुरळून जाते.