शहरातील गोरेलाल चौक, जैन मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली असून याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक भैयालाल बेहार (वय २८, रा. एकोडी, ता. जि. गोंदिया) यांनी आपली मोटारसायकल (क्र. एम.एच.३५ ए.सी. ७७२९ स्प्लेंडर प्लस, किंमत सुमारे ४० हजार रुपये) ही हॅन्डल लॉक करून रोडाच्या बाजूला उभी केली होती.