आदिवासी समाजाचे 228 विद्यार्थी शिक्षणापासून अद्यापही वंचित आहे, हा एक प्रकारे आदिवासी समाजावर आणि विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे असा आरोप करत आज आदिवासी विद्यार्थ्यांची अप्पर आयुक्तांच्या कार्यालयात शाळा भरविण्यात आली. या प्रतीकात्मक आंदोलनासाठी विविध संघटना व आदिवासी समाजाचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक देखील उपस्थित होते.