महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन दि.27 ऑगस्ट रोजी वाजत गाजत रात्री 6 च्या सुमारास कृष्णा गणेश मंडळ मुंडीपार येथे झाले, गेली 21 वर्षे भक्ती, संस्कृती आणि सेवाभावाने सजलेला गणेशोत्सव राधा कृष्णा मंदिरात साजरा होत आहे. यंदाही बाप्पाची प्रतिष्ठापना पारंपरिक थाटात झाली असून, मंडळाने सामाजिक उपक्रमांनी उत्सवाला विशेष तेज दिले आहे. मुंडीपार येथे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला गणेश मंडळाचे सदस्य यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी मोठ्या संख्येत भाविक भक्तगण उपस्थित होते.