दुकानाबाहेरील शेड अनाधिकृत असल्याबाबत महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवासह दोघांना पिंपरी पोलिसांनी गजाआड केले. हा प्रकार पिंपरी कॅम्पात १७ सप्टेंबर रोजी घडला.पंकज बगाडे (वय ४०, रा. आकुर्डी), गणेश दराडे (वय ५०, रा. रमाबाईनगर, पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.