धुळे तालुक्यातील वनी बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी धोकादायक वर्गखोल्या आणि सुविधांच्या अभावामुळे आज अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. शाळेची नवीन इमारत तयार असतानाही, प्रशासन जीव धोक्यात घालून जुन्या व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसवत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.