Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
आज दिन 31 ऑगस्ट सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात मद्यपी पित्याने स्वतःच्या आठ महिन्यांच्या मुलाला दातांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी शाहरुख शेख हा दारूच्या नशेत पत्नी आफरीनने दारू पिण्यावर आक्षेप घेतल्याने संतापला आणि निष्पाप बाळ उमरच्या पाठीवर व मांडीवर चावा घेतला. बाळाला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो आईशिवाय इतरांकडे जात नाही, एवढा भेदरला आहे. घटनेनंतर आरोपीने पत्नीला धमकी दिली होती, मात्र तिने धैर्य दाखवत पोलिसांत