इगतपुरी शहरात ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला. दुपारी नमाज पठण करून या जुलूसाला खालची पेठ येथून सुरुवात झाली. भर पावसातही मुस्लिम बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हा जुलूस तीन लाकडी पूल मार्गे शहरातील प्रमुख मार्गांनी सरदार वल्लभभाई पटेल चौकात पोहोचला. ठिकठिकाणी सजावट, स्वागत व धार्मिक घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. जुलूसाची सांगता सामूहिक नमाज पठण, एकमेकांना शुभ