गडचिरोली पोलिसांकडून आरोग्य शिबिराचे आयोजन गडचिरोली पोलीस दलाने रोटरी क्लब नागपूर, तालुका आरोग्य विभाग, देसाईगंज, आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या सहकार्याने पोस्टे वडसा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात हृदय रोग, स्त्री रोग, बालरोग, कान-नाक-घसा, दंत, आणि नेत्र तज्ज्ञांनी सुमारे 547 नागरिकांची तपासणी केली. गरजूंना औषधे आणि चष्मेही वाटण्यात आले.