मानाचे व नवसाला पावणारे श्रीमंत दादा गणपती मंडळ येथे आज सकाळी नंदुरबार शहरातील आदर्श विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी गणेश उत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पठन केले. या उपक्रमात शाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी श्रीमंत दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष भटू सोनार उपाध्यक्ष मनोज जाधव सचिव निखिल सोनार सदस्य गौरव सोनार शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी भदाणे, शिक्षिका भावेश खेडकर शितल अजबे छाया मराठे शिक्षक सतीश पाटील तुषार सोनवणे हरिश चौधरी आदी उपस्थित होते.