राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली की जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कम्युनिष्ट पक्ष व इतर समविचारी संघटना यांच्यावतीने दि. १० सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दि. १४ रोजी नाशिक येथे राज्यव्यापी पक्षाचे अधिवेशन होणार आहे.