भामरागड तालुक्यातील पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र परलकोटासह पामुलगौतम नदी देखील तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे झाले होते. आज 27 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता च्या सुमारास एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पामुल गौतम नदीतून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.