यवतमाळ शहरातील हरितलॉन जवळ दिनांक 29 ऑगस्ट रोजी एका ट्रक मध्ये 6 ते 7 ब्रास रेती अवैधरित्या विनापरवाना चोरी करून वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये 11 लाख 60 हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.