कपिल जैन वय 48 वर्ष हे त्यांच्या एक्टिवा गाडीने पोलीस ठाणे प्रताप नगर हद्दीतील सुभाष नगर टी पॉइंट येथून जात असताना त्यांना दहा चाकी टिप्पर चालकाने धडक दिली जात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुमित जैन यांनी दिलेला तक्रारीवरून प्रताप नगर पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.