रामटेक शहरात परंपरेनुसार गणेशोत्सवाच्या चौथ्या व पाचव्या दिवशी साजरा करण्यात येणारा ज्येष्ठ गौराई अर्थात महालक्ष्मी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. रविवार दि. 31 ऑगस्टला जेष्ठ गौराईचे आगमन झाले. त्यांची स्थापना करण्यात आली आकर्षक सजावटीत त्या स्थानापन्न करण्यात आल्या सोम. दि. 1 सप्टें.ला ज्येष्ठ गौरी पूजन करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काही परिवारात ज्येष्ठ गौरी पूजनाची 100 ते 150 वर्षाची परंपरा आहे. प्रतीक किरण ढोमणे यांचे कडे 3 पिढ्याची परंपरा आहे.