निफाड:- काटेरी झुडुपात अडकून गंभीर जखमी झालेल्या आणि मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या मोरास सोनेवाडी बु. येथील शेतकऱ्यांनी जीवदान दिले आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतकरी विजय सखाहरी निफाडे व गोरख सखाहरी निफाडे हे लोणजाई गडाच्या पायथ्याशी शेतात काम करत असताना त्यांना फडफड आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मोर काटेरी झुडुपात अडकून रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत होता. याच ठिका