स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्र (आत्मा), काटा रोड, वाशिम येथे आज दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘रानभाजी महोत्सव’ तसेच विविध कृषी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या उपक्रमामध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, वाशिम शेती शिल्प कृषी विपणन, सेंद्रीय शेती उत्पादन विक्री, डेअरी उत्पादन विक्री, वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा, तसेच PMFME अंतर्गत उत्पादन विक्री इत्यादींचा समावेश आहे