बैलांप्रतिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा सण साजरा केला जातो परंतु गेल्या काही वर्षात शेती व्यवसायात वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांनी बैलांचे पालन पोषण बंद केले आहेत अशा परिस्थितीत बहुतेक गावात अत्यल्प प्रमाणातच बैलधारक शेतकरी आढळतात या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बारवा येथील ग्रामस्थांनी शेतीकामासाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टरचा पोळा आयोजित करून बैला प्रति कृतज्ञता व्यक्त केली हा पोळा तारीख 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला होता