27 ऑगस्ट ला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑगस्टला पहाटे दोन ते रात्री नऊ वाजताच्या दरम्यान पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील आराधना नगर येथे राहणारे भाग्यशाली सत्तेय हे परिवारासह चिखलदरा येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.