गंगापूर–वैजापूर रोडवरील नांदूर मध्यमेश्वर कालव्याजवळ सोमवार (८ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता स्कॉर्पिओ आणि मोटारसायकलच्या भीषण धडकेत एका कुटुंबातील पती, पत्नी व त्यांच्या एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. वाळूज एमआयडीसीतील सजन राजू राजपूत (२८), पत्नी शितल (२५) आणि मुलगा कृष्णांश अशी अपघातातील मृतांची नावे आहे.